
नेहरू जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करताना डॉ. विजयकुमार पाटील, समवेत डॉ. मनीषा पाटील
प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे
कोतोली पुढारी वृत्तसेवा
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान–तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी इस्रो, यूजीसी सारख्या संस्थांची स्थापना करून देशाला बळकटी दिली. तसेच भाकरा नांगल, हिराकूड, दामोदर, गांधीसागर असे भव्य प्रकल्प उभारून भारत जलसमृद्ध केला, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील अर्थशास्त्र विभाग व एनएसएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित नेहरू जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक प्राध्यापक दत्तात्रय नाईक यांनी नेहरूंना “आधुनिक भारताचे शिल्पकार” संबोधत त्यांच्या दूरदर्शी विचारांची आठवण करून दिली. अन्नटंचाईच्या काळात पंडितजींनी स्वतःच्या व मंत्र्यांच्या बंगल्यासमोरील गुलाबबाग काढून गहू पिकवण्याचा प्रयोग केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनीषा पाटील, तर आभार प्रा. पी.डी. माने यांनी मानले. शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

