प्रा. महेश साळुंखे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी

0
63

प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे

शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतर्फे सिव्हिल इंजिनिअरिंग विषयात प्रा. महेश सुर्याजीराव साळुंखे यांना पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. ते विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे समन्वयक असून, विद्यापीठाचे निवृत्त कर्मचारी गजाननराव (एस.पी.) साळुंखे यांचे सुपुत्र आहेत.

प्रा. साळुंखे यांनी “In-Elastic Seismic Design of Reinforced Concrete Structures Using Rapid Plastic Method” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या प्रबंधाचे मार्गदर्शन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथील प्रा. डॉ. एस. एन. तंडे यांनी केले.

त्यांचे संशोधन निष्कर्ष राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून भूकंपरोधक आरसीसी रचना डिझाईन क्षेत्रात नवे दृष्टिकोन त्यांनी सादर केले आहेत. ते PWD, ZP, MIDC, MHADA, पोलिस हाऊसिंग इ. विभागांसाठी स्ट्रक्चरल व प्रूफ चेकिंग कन्सल्टंट म्हणूनही कार्यरत आहेत.

या यशाबद्दल मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी सौ. शुभांगी गावडे, सीईओ श्री. कौस्तुभ गावडे, हितेंद्र साळुंखे यांनी प्रा. साळुंखे यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here