
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘शिक्षक सक्षमीकरण’ कार्यशाळा उत्साहात पार
कोल्हापूर प्रतिनिधी- पांडुरंग फिरींगे
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या वतीने आयोजित ‘शिक्षक सक्षमीकरण’ या विषयावरील कार्यशाळेत तणावमुक्त आणि समतोल जीवनशैलीच सुखी आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन मनशक्ती केंद्र, लोणावळा येथील डॉ. संजीवकुमार पाटील यांनी केले.
“काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या पाच विकारांवर नियंत्रण ठेवणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने शांत, संतुलित आणि सुखी आयुष्य जगू शकतो,” असे सांगत त्यांनी महाभारत काळातील विविध व्यक्तिमत्त्वांचे स्वभावगुण, त्यांच्या प्रवृत्ती आणि कमतरता यांची उदाहरणे देत मानवी जीवनातील ‘स्व-नियंत्रण’ व ‘मनशक्ती’चे महत्व स्पष्ट केले.
आदर्श शिक्षकाकडे कोणते गुण असावेत, शिक्षक–विद्यार्थी नातेसंबंधाचा आदर्श पॅटर्न कसा असावा, तसेच कुटुंब आणि कार्यक्षेत्रातील समतोल शिक्षकांना कसा साधता येईल याबाबतही त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
“कोणतेही काम आवडीने केले, तर आनंद मिळतो आणि कामातून समाधान निर्माण होते,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन आकर्षक पद्धतीने
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी रचित संस्था प्रार्थनेने झाली.
प्रास्ताविक डॉ. श्रुती जोशी (समन्वयक, IQAC) यांनी केले.
सूत्रसंचालन सकाळ सत्राच्या स्टाफ सेक्रेटरी डॉ. कविता तिवडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. आर. कट्टीमनी यांनी केले.
महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

