रेणुका मंदिराजवळ सुरू असलेल्या पत्याच्या जुगारावर LCB ची धडक कारवाई!

0
14

१२ जुगारी ताब्यात – १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त**

कोल्हापूर प्रतिनिधी – पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात छेडलेल्या मोहिमेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) आणखी धार देत हेरवाड (ता. शिरोळ) येथील रेणुका मंदिर परिसरात पत्याच्या जुगारावर मोठी कारवाई केली.
या कारवाईत १२ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून एकूण १,२२,६९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांबरोबरच LCB ला सतत गुप्त पद्धतीने तपास व छापे टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या.

गोपनीय बातमीदाराच्या माहितीवर कारवाई

पोलीस अंमलदार संजय कुंभार व सागर माने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,
कुमार पाटील यांच्या घरामध्ये रमी नावाचा जुगार मोठ्या पैशात खेळला जात आहे.

त्यानुसार LCB चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने १४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता छापा टाकला.

अटक केलेले १२ जुगारी

छाप्यात खालील इसम पैसे लावून पत्याचा जुगार खेळताना सापडले –
अर्जुन पुजारी (४५), प्रकाश गवंडी (५२), आप्पा धामणे (७३), गौतम शिंगे (२९),
मुरारी नरवाडे (४०), राजकुमार पाटील (३५), तानाजी कुन्नुरे (५०),
सुदाम जाधव (७६), धनंजय कांबळे (५३), दत्ता शिरगन्नावर (३७),
नामदेव गायकवाड (५२) आणि संतोष कुन्नुरे (४४).

जप्त केलेला मुद्देमाल

रोख रक्कम – ₹9,190

मोबाईल फोन – १० नग (किंमत ₹53,500)

मोटरसायकल – किंमत ₹60,000

पत्त्याचे संच

एकूण किंमत : ₹1,22,690

मुख्य सूत्रधाराचा उलगडा

चौकशीत अटक आरोपींनी सांगितले की
अमित पांडुरंग शिरोळे (रा. हेरवाड) हा हा जुगार अड्डा चालवत असून
प्रत्येक खेळातून तो कमिशन घेत असे. तसेच जुगार सुरु असलेले घर त्याने
मालक कुमार बाळगोंडा पाटील यांचेकडून भाड्याने घेतल्याचेही समोर आले.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

ही कारवाई

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,

पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे,

पोलीस कर्मचारी संजय कुंभार, सागर माने, महेश पाटील, महेश खोत, विशाल चौगले, प्रवीण पाटील, सतिश सुर्यवंशी
यांनी संयुक्तरीत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here