
सीपीआर रूग्णालयात भेट देऊन दिला धीर
कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर शहरात नुकत्याच घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हॉटेल वूडलँड येथील माळी तुकाराम सिधू खोंदल यांची शिवसेना उपनेते संजय पवार यांनी छत्रपती प्रभू (CPR) रुग्णालयात भेट घेतली.
संजय पवार यांनी खोंदल यांची प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक मदत व सहकार्याचे आश्वासनही दिले. शहरामध्ये निर्माण झालेल्या वन्यप्राणी-मनुष्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
या भेटीदरम्यान संजय पवार यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी देखील चर्चा करून खोंदल यांच्या उपचारांची माहिती घेतली व पूर्ण सहकार्याची भूमिका स्पष्ट केली.

