
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुरगूड पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून
शरद मारूती परबंकर (३६, रा. मळगे बुद्रुक) याला अटक केली. त्याच्याकडून ३३० ग्रॅम गांजा, मोबाईल आणि स्कुटीसह एकूण २८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांच्या आदेशांनुसार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सापळा व जप्तीची कारवाई P.I. रविंद्र कळमकर, सहा. P.I. शिवाजी करे, P.S.I. जालिंदर जाधव यांच्या पथकाने केली.
उपस्थित अधिकारी व पोलिस कर्मचारी:
विशाल खराडे, वैभव पाटील, प्रदिप पाटील, योगेश गोसावी, रोहित मर्दाने, अशोक पवार, विजय इंगळे, गजानन गुरव, हंबीरराव अतिग्रे, प्रशांत गोजारे, संदीप ढेकळे, बजरंग पाटील, रूपशे पाटील.
अंमली पदार्थ विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणणारी ही कारवाई जिल्हा पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी ठरली.

