फुलेवाडीचा अभिमान – गितांजली साठे Class-1 अधिकारी!

0
565

MPSC परीक्षेत उज्वल यश; गावभर जल्लोष, ढोल-ताशांत मिरवणूक

कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरींगे
फुलेवाडीची कन्या गितांजली गोपाळ साठे हिने MPSC परीक्षेत ऐतिहासिक घवघवीत यश मिळवत राजपत्रित Class-1 अधिकारी पदावर भव्य निवड मिळवली आहे.
STI, AMVI तसेच कर निर्धारण अधिकारी अशा सर्व उच्च पदांसाठी पात्रता मिळवत तिने फुलेवाडीचा सन्मान निखळ अभिमानाने उंचावला.
बाईट गितांजली साठे

गावात ही बातमी कळताच वातावरण जल्लोषात न्हाऊन निघाले. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात, महिलांच्या ओवाळणीच्या मंगल शुभेच्छात गितांजलीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी पेढे भरवून यशाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

या वेळी
राहुल आपटे, आशिष साठे, क्रांती साठे, शारंगधर देशमुख, मानसिंग पाटील, रिंकू देसाई, माधवी पाटील, अमर पाटील, श्रीकांत पवार, सर्जेराव गायकवाड, सदाशिव तांदळे, गणेशाचार्य परळीकर, रवी पवार, रोहित आपटे, हृतिक आपटे, विवेक साठे, अभिजीत साठे
यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

गितांजलीच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू, आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाची झळाळी—फुलेवाडीच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here