
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त उंचगावात भावनिक वातावरण निर्माण झाले. शिवसेना शाखा क्र. ३, बाल हनुमान मित्र मंडळ हॉल येथे करवीर शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण व करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञ अभिवादन करण्यात आले.
या क्षणी घोषणांचा गजर करत –
“अमर रहे… अमर रहे… बाळासाहेब अमर रहे!”
“परत या… परत या… बाळासाहेब परत या!”
असा निनाद करत शिवसैनिकांनी परिसर भारावून टाकला.
कार्यक्रमाला करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव सरपंच मधुकर चव्हाण, अरविंद शिंदे, विराग करी, दीपक रेडेकर, दिनकर पोवार, सुनील चौगुले, सागर पाटील, योगेश लोहार, दत्ता फराकटे, सागर नाकट, विनय शिरसागर, आबा जाधव, दत्तात्रय विभुते, रामराव पाटील, रणजीत गाताडे, रोहन यादव, बाळासाहेब हाके, भागवत ढाकणे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिकांच्या उत्कट घोषणांनी व बाळासाहेबांच्या स्मृतीने उंचगावात आज शिवस्वाभिमानाचा जाज्वल्य ज्वालामुखीच पेटला! 🚩

