
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचा अभिमान वाढवणारी झळाळती कामगिरी! कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची ‘टीम भास्कर’ प्रतिष्ठेच्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ (सॉफ्टवेअर एडिशन) स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवडली गेली आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व एआयसीटीई, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा ८ आणि ९ डिसेंबर रोजी आयआयटी हैदराबाद येथे होणार आहे.
ही देशातील सर्वात मोठी नॉन-स्टॉप प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्पर्धा मानली जाते. संजीवनच्या विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ‘इलेक्ट्रिक ग्रीड मॉडेल’ तयार केले असून, नाविन्यपूर्ण कल्पकतेची छाप या प्रकल्पावर उमटली आहे.
⭐ टीम भास्करचे सदस्य
ऋषिकेश शिंदे (टीम प्रमुख)
अनिकेत गोसावी,
अल्ताफ शेख,
पूजा निगवे,
कृष्णा पोल,
वैष्णवी कोळी
या सर्वांना विभागप्रमुख प्रा. राहुल नेजकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांचा संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले व सहसचिव एन. आर. भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अंतिम फेरीत विजयी होण्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमावेळी प्राचार्य डॉ. संजीव जैन, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एकनाथ साळोखे, डॉ. गजानन कोळी, रजिस्ट्रार दिपक पाटील, लेखापाल कृष्णात शिंदे, प्रा. पल्लवी पाटील, प्रा. विशाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

