चौगुले महाविद्यालयात प्रमाणपत्राचे वाटप

0
55

फोटो ओळ-श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये बालवाडी शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वाटप करताना डॉ.उषा पवार, डॉ.बी.एन.रावण,डॉ.मनीषा पाटील,प्रा.ए.आर.महाजन,प्रा.डी.एच.नाईक व विद्यार्थिनी

प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व कौशल्य विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभागा मार्फत बालवाडी शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला त्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र वितरण ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ.उषा पवार,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रोफेसर डॉ.बी.एन.रावण यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक व स्वागत कौशल्य विकास समिती प्रमुख डॉ.मनीषा पाटील यांनी केले आभार प्रा. ए.आर.महाजन यांनी मानले.

या समितीमार्फत एकूण चौदा विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here