
कोल्हापूर प्रतिनिधी:पांडुरंग फिरिंगे
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या झोनल व इंटरझोनल मैदानी स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाच्या महिला संघाने दमदार कामगिरी करत उपविजेतेपदाची चॅम्पियनशिप पटकावली.
कु. रिया पाटील (M.Sc. CS-1) हिने झोनल व इंटरझोनल ४०० मीटर धावण्यात सुवर्णपदकासह सर्वोत्कृष्ट खेळाडू तर मैदानी वैयक्तिक चॅम्पियनशिप जिंकली.
कु. तितिक्षा पाटोळे (B.A.-2) हिने 100 व 200 मीटर धावण्यात झोनल व इंटरझोनल मिळून चार पदकांचे यश संपादन केले.
कु. तन्वी जमसांडेकर (BBA-3) हिला २०० मीटर, तिहेरी उडी यांत झोनल-इंटरझोनल मिळून तीन पदके प्राप्त.
कु. रितिका मगदूम (M.A.-2) हिने लांब उडीमध्ये झोनल व इंटरझोनल दोन सुवर्णपदके पटकावली.
कु. गौरी भारती (B.Sc-3) हिने थाळीफेक मध्ये झोन व इंटरझोन सिल्वर, तर कु. सानिका बोडके (B.Sc-1) हिला 100 मी. हर्डल्समध्ये ब्राँझ पदक मिळाले.
रिले प्रकारात संघाने झोनल ४×१०० व ४×४०० मीटरचे सुवर्ण, तर इंटरझोनल ४×१०० मीटरचे सुवर्ण पटकावले. कु. श्रावणी जाधव (B.Com-1) रिले संघात सहभागी.
या उत्कृष्ट यशाबद्दल सर्व खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन.
या मागे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, CEO कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, श्री. सुरेश चरापले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

