
कोल्हापूर : जानवी घोगळे
सेंट्रल असोसिएशन ऑफ प्रायव्हेट सिक्युरिटी इंडस्ट्रीज अर्थात कॅप्सी इंडिया पश्चिम विभागा तर्फे युनिव्हर्सल सिक्युरिटी व युनिग्लोबसचे संस्थापक कॅप्टन उत्तम पांडुरंग पाटील(शिंगणापूरकर) यांना सुरक्षा व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल, “सिक्युरिटी पर्सनॅलिटी ऑफ द इयरचा पुरस्कार” कॅप्सीचे राष्ट्रीय अध्यक्ष कुवर विक्रम सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नुकताच चेन्नई येथे झालेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार सोहळा पार पडला, सेंट्रल असोसिएशन ऑफ प्रायव्हेट सिक्युरिटी इंडस्ट्रीज ही भारतातील महिला व पुरुष सुरक्षा व्यवसायिकांची व्यवस्थापन करणारी सर्वात मोठी संस्था असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ती सुरक्षा रक्षकांच्या हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करते. कॅप्टन पाटील यांनी आपल्या युनिव्हर्सल पर्सोनेल सिक्युरिटी ट्रेनिंग सर्विसेस व युनिग्लोस रिसोर्सच्या माध्यमातून हजारो युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या असून, सुरक्षा व्यवसायातील एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आले आहे.
यावेळी कॅप्सीचे राष्ट्रीय अध्यक्ष कुवर विक्रम सिंग, राष्ट्रीय सरचिटणीस महेश शर्मा, सचिव अशोक कट्टी, तामिळनाडू कार्यकारी मंडळाचे नेव्हिल रायन यांच्यासह पुरस्कार वितरण समितीचे प्रमुख पदाधिकारी तसेच देशभरातील सुरक्षा व्यवसायिक व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

