
कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरींगे:
संकटातून संकल्पाकडे… या प्रेरणादायी ध्येयाने कार्यरत राहून विवेकानंद कॉलेजने पुरग्रस्तांसाठी केलेल्या भरीव मदतीला राज्यस्तरावर मानाचा मुजरा मिळाला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत पुण्यातील मॉडर्न कॉलेज येथे आयोजित विशेष कार्यक्रमात विवेकानंद कॉलेजचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.🌧️ अतिवृष्टीतील संकटात विवेकानंद कॉलेजची धाव:
मराठवाडा विभाग व सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असताना विवेकानंद कॉलेजने समाजहिताची जबाबदारी अंगीकारली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा हे महाविद्यालय दत्तक घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि समाजाला उभारी देण्यासाठी विविध पातळ्यांवर मोठे कार्य राबविण्यात आले.
साहाय्याचा मोठा हात – एकत्रित प्रयत्नांचा विजय:
तत्कालीन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या प्रेरणेतून –
शैक्षणिक साहित्य
कपडे प्रवास खर्चासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत
खाद्यपदार्थ व जीवनावश्यक साहित्य
…अशा विविध माध्यमांतून मदत संकलित करून करमाळा येथील दत्तक महाविद्यालयात पोहोचवण्यात आली.
संपूर्ण महाविद्यालय एकदिलाने पुढे:
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, एनएसएस व एनसीसी स्वयंसेवकांच्या निस्वार्थ योगदानामुळे हा उपक्रम भव्य यशस्वी झाला.
सन्मान स्वीकारताना उपस्थित होते—
प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात,
डॉ. संदीप पाटील,
डॉ. ए. एस. कुंभार,
डॉ. पी. आर. बागडे,
डॉ. ए. एस. महात
तसेच महाविद्यालयाच्या यशात विशेष योगदान—
सहा. ग्रंथपाल श्री. हितेंद्र साळुंखे,
रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे,
इतर सर्व शिक्षक व कर्मचारीवर्ग.
या सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे विवेकानंद कॉलेजने संकटातून संकल्पाकडे या उपक्रमात राज्यात आपली वेगळी छाप उमटवली आहे.

