
कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरींगे
नाशिक देवबंद हॉल पंचवटी येथे ११ ते १६ नोव्हेंबर २०२५ या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या क्लासिकल रेटींग स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरचा बी.कॉम भाग १ मध्ये शिकत असणारा विद्यार्थी ऋषिकेश कबनूरकरने ८ फेरीत खेळताना दुसऱ्या बोर्डवर ७ गुण मिळवून खुल्या गटात ५ वा क्रमांक मिळवून रोख रक्कम ८०००/- रुपयाचे पारितोषिक आणि चषक पटकावले. त्याच बरोबर ५१.६ फिडे रेटिंगची कमाई केली. आंतरराष्ट्रीय खुल्या क्लासिकल बुद्धिबळ रेटींग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित ९१ सह २३६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेला एकूण ३.००.०००/- रुपये इतकी पारितोषिक होती.
ऋषिकेश हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतो. तो विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्रभारी प्राचार्य डॉ.एस.पी.थोरात, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के.धनवडे, श्री. सुरेश चरापले तसेच कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

