प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): सन 2025-26 वर्षासाठीचे Digital Life Certificate (ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र) निवृत्तीवेतनधारकांनी नियमानुसार ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अनिवार्य असून, पेन्शनधारकांनी दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे वेळेत जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन कोषागार अधिकारी श्रीमती अ. अ. नराजे यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांसाठी मोबाईलवरून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची प्रक्रिया उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी Google Play Store वरून Aadhaar Face RD App तसेच Jeevan Pramaan App डाउनलोड करणे आवश्यक आहे. ॲप उघडल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन/ऑपरेटर आयडेंटिफिकेशन प्रक्रियेअंतर्गत आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी भरून फोटो स्कॅन करावा. पेन्शनर स्वतः किंवा इतर कोणाही व्यक्तीद्वारे ऑपरेटर म्हणून नोंदणी करता येते. ऑपरेटर रजिस्ट्रेशननंतर Pensioner Identification स्क्रीनवर पेन्शनधारकाचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक भरून ओटीपीद्वारे पडताळणी करावी. त्यानंतर उघडणाऱ्या स्क्रीनवर खालील माहिती अचूक भरावी:
Pensioner Office – नाव, Type of Pension – Service / Family, Organisation Type – State Government, Sanctioning Authority – State Government of Maharashtra, Disbursing Agency – Maharashtra State Treasury, Treasury – Kolhapur DTO, PPO No. – अचूक टाकावा, Account No.- अचूक टाकावा, Re-employed – होय/नाही, Re-married – होय/नाही
माहिती तपासून Submit केल्यानंतर मोबाईल कॅमेरा सुरू होऊन चेहरा स्कॅन करावा व डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट करून कन्फर्मेशन द्यावे. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्रे व सेतू केंद्रांमध्येही उपलब्ध असल्याची माहिती कोषागार विभागाने दिली आहे.

