महामार्गाचे काम अधिक गतीने करण्यासाठीअतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करा

0
9

प्रतिनिधी :जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 (रत्नागिरी–कोल्हापूर) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (कागल- सातारा) या महामार्गाची कामे अधिक गतीने करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करुन महामार्गाची प्रलंबित कामे पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 (रत्नागिरी–कोल्हापूर) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (कागल–सातारा) कामकाज आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी प्रकल्प संचालक एस. एस. कदम, प्रबंधक गोविंद बैरवा, उपजिल्हाधिकारी समन्वय अर्चना नष्टे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि तांत्रिक सल्लागार व कंत्राटदार संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामकाज करा, अशा सूचना दिल्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (कागल–सातारा) या मार्गावरील कामे संथ गतीने होत आहे. यामुळे या कामाच्या विलंबास जबाबदार असलेल्या संबंधितावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, असे आदेश दिले. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (कागल–सातारा) चे संबंधित ठेकेदार यांच्या सोबत स्वतंत्र बैठक लावण्याचे निर्देश यावेळी दिले. महामार्ग क्र. 166 रत्नागिरी–कोल्हापूर या मार्गावरील भूसंपादनातील प्रलंबित अडचणी, महामार्गावरील खड्डे, आणि वाढलेला प्रवासकाल याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी कामे कधी पूर्ण होईल याबाबत कंत्राटदारांना विचारणा केली असता एप्रिल 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण करु असे कंत्राटदारांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here