विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण ज्ञान आत्मसात करावे’

0
195

— सौ. अरुंधती धनंजय महाडिक, अध्यक्षा, भागिरथी महिला संस्था**

विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमध्ये एज्युकेशन फेअर उत्साहात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी:पांडुरंग फिरींगे
“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांच्या बळावर विद्यार्थी उद्योग, व्यवसाय, सेवा आदी विविध क्षेत्रात आपले करिअर घडवू शकतात. शिक्षणाचा खरा उपयोग समाजातील विषमता, अंधश्रद्धा व सुशिक्षित बेकारीसारख्या समस्यांना दूर करण्यासाठी व्हायला हवा. आजच्या स्पर्धेच्या युगात पुस्तकातील शिक्षणापुरते न राहता कौशल्याधिष्ठित शिक्षणाला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांनी केले.

त्या विवेकानंद ज्युनिअर कॉलेज आयोजित ‘एज्युकेशन फेअर’ या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करीत होत्या. विद्यार्थिनी सातत्य, धाडस, अभ्यासू वृत्ती आणि कौशल्य यांच्या जोरावर आज अनेक क्षेत्रात उज्वल यश मिळवू शकतात, असेही त्या म्हणाल्या.
कला–गुणांना व्यासपीठ

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात अत्यंत उत्साहात आयोजित केलेल्या या फेअरमध्ये कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांचे मनोहारी सादरीकरण केले.
स्वागत व प्रास्ताविक करताना प्रा. सौ. शिल्पा भोसले म्हणाल्या,
“एज्युकेशन फेअरमुळे विद्यार्थ्यांमधील कला, संगीत, नृत्य, अभिनय आदी सुप्त गुणांना आविष्काराची संधी मिळते. त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासास या उपक्रमातून मोठी चालना मिळते.”
कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने व रोपांना पाणी घालून पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली.
आभारप्रदर्शन प्रा. बी.एस. कोळी यांनी केले, तर उत्तम सूत्रसंचालन प्रा. विश्वंभर कुलकर्णी यांनी केले.
उल्लेखनीय उपस्थिती

या कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेजच्या कला व वाणिज्य विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी–विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रजिस्ट्रार श्री. एस.के. धनवडे तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here