
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे– कोतोली येथील ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा केंद्र येथे आज महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी अचानक भेट देत केंद्राच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.या विशेष भेटीत प्रदेश अध्यक्ष सचिन पाटणकर, प्रदेश सचिव सुशीलकुमार उर्फ मदन माने, शाहूवाडी विभाग प्रमुख अनिल माने, तसेच ज्येष्ठ पदवीधर संचालक कृष्णा नाईक यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.यावेळी केंद्राचे संस्थापक डॉ. संजय पाटील, योगेश्वर संजय पाटील, मयूर संजय पाटील, शैलेश मस्कर, सौरभ मस्कर, नयन पोवार, शुभम भोसले आदी पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील ज्ञानज्योती केंद्राचे सातत्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा विश्वास, तसेच ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन पुरवण्याच्या उपक्रमाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले.मान्यवरांनी आगामी काळातही अधिक व्यापक, नियोजनबद्ध व विद्यार्थीकेंद्रित कामकाज राबविण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.ज्ञानज्योती केंद्राने केलेल्या कार्याचे सर्वांनी कौतुक करत “या केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत आहे,” असेही मत व्यक्त केले.

