
प्रतिनिधी : जानवी घोगळे
“महापालिका उमेदवार निवडीत खऱ्या हिंदुत्वनिष्ठांना प्राधान्य द्या”कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवस्वराज्य मंच, हिंदू एकता आंदोलन, शिवप्रतिष्ठान, हिंदू महासभा आदी संघटनांनी भाजप व शिवसेना नेतृत्वाला संयुक्त निवेदन देत उमेदवार निवडीत कट्टर हिंदुत्वनिष्ठ निकष लागू करण्याची मागणी केली.संघटनांनी हिंदुत्व रक्षणाची लेखी शपथ, हिंदुत्वाशी संबंधित प्रत्यक्ष कृतींची पडताळणी, आणि खऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य हे तीन मुद्दे अनिवार्य करण्याची सूचना केली. “हिंदुत्वाशी संबंध नसलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊ नका,” अशी स्पष्ट भूमिका निवेदनात व्यक्त करण्यात आली.या मोहिमेची सुरुवात शिवस्वराज्य मंचाचे समन्वयक दिपक देसाई यांच्या नेतृत्वाखाली झाली असून, पुढील काही दिवसांत इतर हिंदुत्वनिष्ठ पक्षांनाही अशीच मागणी केली जाणार आहे.निवेदन देताना विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनांनी संघर्ष नव्हे तर सकारात्मक संवादातून न्याय्य प्रतिनिधित्व मिळवण्याचा हेतू असल्याचे सांगितले.

