
प्रतिनिधी : जानवी घोगळे
अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत भव्य कार्यशाळा संपन्नकोल्हापूर प्रतिनिधी -पांडुरंग फिरींगे“प्रभावी शिक्षणासाठी ए.आय. तंत्रज्ञानाचा योग्य वापर अत्यावश्यक असून शिक्षक व विद्यार्थी यांनी बदलत्या शिक्षणपद्धतीशी जुळवून घेत एआयकडे आवश्यक कौशल्य म्हणून पाहिले पाहिजे,” असे मार्गदर्शन राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर येथील संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन पाटील यांनी केले.विवेकानंद महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातर्फे ‘AI Powered Teaching & Learning : Aligning with NEP 2020’ या विषयावर आयोजित कार्यशाळा अग्रणी महाविद्यालय योजना (New College Cluster) अंतर्गत उत्साहात पार पडली. कार्यक्रमा्च्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात होते. शिक्षणातील एआयची क्रांती!राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार Blended Learning, Flipped Classroom यांसारख्या आधुनिक शिक्षण पद्धतींची गरज अधोरेखित करताना डॉ. पाटील म्हणाले की,“तंत्रज्ञानामुळे शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. एआयमुळे शिक्षण अधिक प्रभावी, वेगवान व विद्यार्थी-केंद्रित होत आहे.” ई-लर्निंगवर विशेष सत्रदुपारच्या सत्रात सायबर कॉलेजच्या डॉ. रजनी कामत यांनी E-Learning या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर, ऑनलाइन शिक्षणाची व्याप्ती आणि भविष्यातील संधी यावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात आणि आयोजनकार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थना व रोपांना पाणी घालून पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली.प्रास्ताविक व स्वागत अग्रणी महाविद्यालय कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. इरफान मुजावर यांनी केले.आभार प्रदर्शन संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विशाल वाघमारे यांनी मानले. प्रचंड प्रतिसाद – मोठ्या संख्येने उपस्थितीअग्रणी महाविद्यालय योजना (New College Cluster) अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी, डॉ. राजश्री पाटील, प्रा. महेश पाटील, प्रा. शुभांगी बैस, प्रा. सोनल औंधकर, प्रा. निकिता हुडे, प्रा. मनिषा दबडे, तसेच रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे व सर्व प्रशासकीय कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाकडे महत्त्वपूर्ण वाटचालया कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना एआय, डिजिटल शिक्षण साधने, नव-शिक्षणपद्धती यांचे व्यावहारिक ज्ञान मिळाले. बदलत्या जगात एआयचा प्रभावी वापर करून शिक्षण अधिक सुसंगत करण्याचे बळकटीकरण या कार्यशाळेतून घडले.— विवेकानंद महाविद्यालय, संगणकशास्त्र विभाग

