
प्रतिनिधी :जानवी घोगळे
बंडखोरी मोडीत..महाबळेश्वर :महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, शिवसेना (शिंदे गटाला) मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बहिणीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला असून, त्यानंतर स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतून उमेदवारीची अपेक्षा असलेल्या त्यांच्या बहिणीने नाराजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशामुळे शिवसेनेत निर्माण झालेली बंडखोरीची चिन्हे मोडीत निघाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.निवडणूक समीकरणे बदलणार?महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एक मजबूत स्थानिक चेहरा मिळाल्याने आगामी लढत अधिक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाने नगराध्यक्षपदासाठी ज्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केले, त्यास स्थानिक पातळीवर विरोध होता. हाच विरोध बंडखोरीतून थेट पक्षांतरापर्यंत पोहोचला.स्थानिक पातळीवर चर्चा रंगल्या शिंदे गटाच्या नेतृत्वावर असलेले नाराजीचे वातावरण राष्ट्रवादीच्या गोटात अचानक मिळालेला अनपेक्षित बळकटीचा ‘बूस्टर’ नगराध्यक्षपदासाठी जिंकण्याची समीकरणे बदलणारया सर्व घटनाक्रमामुळे महाबळेश्वरमधील स्थानिक राजकीय पटल पूर्णपणे ढवळून निघाले आहे.शिंदे गटाची प्रतिक्रियाघडामोडींवर शिंदे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी “ही काही मोठी बाब नाही, आम्ही संघटित आहोत आणि निवडणूक आत्मविश्वासाने लढवणार आहोत”अशी प्रतिक्रिया दिली असली तरी, अंतर्गत नाराजी सार्वजनिक होण्यामुळे पक्षाच्या रणनीतीला तडा गेला असल्याचे बोलले जात आहे राष्ट्रवादीत उत्साह तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी “महाबळेश्वरचा जनमताचा कल आमच्याकडे आहे. मजबूत नेतृत्वामुळे विजय अधिक निश्चित झाला आहे” असे म्हणत आत्मविश्वास व्यक्त केला.पुढील काळात नवे समीकरण?शिंदे गटातील सुरू असलेली नाराजी, राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव आणि नगराध्यक्षपदाभोवतीचे राजकीय गेमचेंजर पाऊल यामुळे महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक अत्यंत रोचक होण्याची चिन्हे आहेत.

