
कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरींगे
महाराष्ट्र शासनाच्या टीईटी परीक्षेपूर्वी पेपरफुटीचा प्रयत्न करणारे रॅकेट कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी उधळले. स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगूड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत दत्तात्रय चव्हाण, गुरुनाथ चौगले, अक्षय कुंभार, किरण बरकाळे, नागेश शेंडगे, राहुल पाटील, दयानंद साळवी यांना अटक करण्यात आली असून १० संशयितांना ताब्यात घेण्यात आले.विद्यार्थ्यांची शैक्षणिक मुळ कागदपत्रे, प्रिंटर, मोबाईल, चारचाकी वाहन असा १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुख्य सुत्रधार महेश गायकवाड (सातारा) याचा शोध सुरू आहे.कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार साओ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी करे व पथकातील पोलीस कर्मचारी युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदीप पाटील, राजू कोरे, रोहित मर्दाने, विजय गोसावी, अमित सर्जे, अमित मर्दाने, निवृत्ती माळी, महेश खोत, सागर चौगुले, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, संदीप ढेकळे, संतोष भांदिगरे, रविंद्र जाधव, रघुनाथ राणभरे, भैरू पाटील, रुपेश पाटील व महिला पोलीस अमंलदार मिनाक्षी कांबळे यांच्या सहकार्याने करण्यात आली.परीक्षेपूर्वीच रॅकेटचा भांडाफोड करत पोलिसांनी मोठी कारवाई केली.

