
प्रतिनिधी: जानवी घोगळे
SP-9 मराठी माध्यम समूहाकडून भारतीय संविधानाची विशेष फोटो फ्रेम देऊन प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यदयांचा सत्कार करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या या अभिनेत्रीने माध्यम समूहाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.या भेटीदरम्यान, एस.पी. नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांनी समूह विविध प्लॅटफॉर्मवर—न्यूज, सोशल मीडिया, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम—या क्षेत्रांत कोणत्या पद्धतीने काम करतो याची सविस्तर माहिती दीपाली सय्यद यांना दिली.

समाजातील घडामोडींवर प्रकाश टाकणे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सकारात्मक पत्रकारितेसाठी माध्यम समूह करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.दीपाली सय्यद म्हणाल्या, “एस.पी. नाईन मराठी माध्यम समूह कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून काम करत आहे. मी स्वतः चित्रपटसृष्टीतील एक कलाकार असल्याने, कलाकारांसाठी अशी संधी आणि चांगले माध्यम उपलब्ध करून देणे ही प्रशंसनीय गोष्ट आहे.

कोल्हापूरसारख्या सांस्कृतिक नगरीत एवढे सुंदर आणि आशयघन काम करणारा चॅनेल आहे, याबद्दल माझ्या सदैव शुभेच्छा आहेत.”*यावेळी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, भाजप युवा नेते अजय चौगुले, जाहिरात मॅनेजर श्रीकांत शिंगे, तसेच शुभम शिखरे , रवींद्र पवार, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, समूहाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे (दि. ९ जानेवारी २०२६) निमंत्रण दीपाली सय्यद यांना देण्यात आले. त्यांनी हे निमंत्रण हसतमुखाने स्वीकारत, “नऊ जानेवारीला मी स्वतः उपस्थित राहण्याची ग्वाही देते,”असे सांगत माध्यम समूहाच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



