
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोतोली पंचायत समिती उमेदवारीसाठी युवा नेतृत्वाचा दमदार दावा सोनल अनिलकुमार दळवी यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांची आमदार डॉ. विनय कोरे यांच्याकडे भेटकोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे : कोतोली पैकी कणेरी गावातील उत्साही व सर्वमान्य युवा नेता सोनल अनिलकुमार दळवी यांच्या कोतोली पंचायत समिती उमेदवारीसाठी कणेरी–बांधारी तसेच संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आज आमदार डॉ. विनयराव कोरे यांची भेट घेऊन ठोस पाठिंबा दर्शविला.यावेळी कार्यकर्त्यांनी दळवी यांच्या उमेदवारीचा नैसर्गिक हक्क असल्याचे सांगत, स्थानिक विकासकामांसाठी त्यांचे नेतृत्व सक्षम आणि आवश्यक असल्याचे मत मांडले.🔶 आमदार डॉ. कोरे यांचे सकारात्मक आश्वासनकार्यातील सातत्य, संघटनशक्ती आणि जनसंपर्क लक्षात घेता या उमेदवारीवर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन आमदार डॉ. विनय कोरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. या आश्वासनाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.🔶 “विकासासाठीच उमेदवारी मागितली” — सोनल दळवीकोतोली मतदारसंघातील बांधारी व परिसरातील गावांचा सर्वांगीण विकास हा माझा एकमेव ध्यास आहे. जनतेची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास याच्या आधारावरच मी उमेदवारीची मागणी केली, असे दळवी यांनी यावेळी सांगितले.🔶 मान्यवरांची उपस्थिती – पाठिंब्याची एकजूटया भेटीवेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात प्रमुख उपस्थिती—माजी जि.प. सदस्य शंकर पाटील,माजी सरपंच मनोहर पाटील,माजी उपसरपंच संभाजी पोवार,बजरंग लगारे,रमेश कांबळे,सागर पाटील,मार्केट कमिटी संचालक दिलीप पोवार,उत्तम पाटील…आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

