
प्रतिनिधी : जानवी घोगळे
एलेन करियर इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्रात आणखी एक पाऊल- एलेन शार्प द्वारे दि. २१ डिसेंबर रोजी रोख बक्षिसे आणि ९०% पर्यंत शिष्यवृत्ती मिळविण्याची संधीभारतातील आघाडीची अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. एलेन करियर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड संस्थेने राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्रापैकी एक असलेल्या कोल्हापुरात त्यांचे ऑफलाइन क्लासरूम सेंटर सुरु करीत असल्याचे जाहीर केले. रविवारी हॉटेल द फर्न, कोल्हापूर येथे आयोजित उद्द्घाटन समारंभ आणि पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.या कार्यक्रमात ‘एलेन’चे संचालक श्री. नवीन माहेश्वरी, झोनल प्रमुख आणि उपाध्यक्ष श्री आशुतोष हिसारिया, उपझोनल प्रमुख आणि एलेन पुर्ण सेंटर प्रमुख श्री अरुण जैन, एलेनचे माजी विद्यार्थी, स्थानिक शाळांचे मुख्याध्यापक आणि पालक उपस्थित होते.

समारंभात, मान्यवरांनी संयुक्तपणे एलेन कोल्हापूरचे अधिकृत पोस्टर अनावरण केले. या नव्या शाखेसह एलेन महाराष्ट्रात आपले अस्तित्व मजबूत करत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, नाशिक, लातूर, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर येथे पूर्वीपासून ऑफलाइन केंद्रे चालवत आहेत.कार्यक्रमात बोलताना संचालक श्री. नवीन माहेश्वरी म्हणाले, “एलेन चे ध्येय प्रत्येक विद्यार्थ्यांला दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आहे. आमच्या प्रमुख वर्ग केंद्रांमध्ये प्रवास करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. कोल्हापुरात जागरुक आणि आकांक्षी पालक समुदाय आहे, जो त्यांच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही कोल्हापुरात हा प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहोत. विद्यार्थी आणि पालक संपूर्ण महाराष्ट्रात एलेन वर असलेला विश्वास वाढवतील अशी आम्हाला खात्री आहे.”नवीन केंद्राबद्दल माहिती देताना, झोनल प्रमुख श्री. आशुतोष हिसारिया यांनी सांगितले की एलेन कोल्हापूर कार्यालय रीजेंट टॉवर, 223-E वॉर्ड, ताराबाई पार्क येथे सुरू झाले आहे. विद्यार्थी प्रवेश आधीच सुरु झाले आहेत. सुरुवातीच्या बॅचमध्ये प्रवेश घेणान्या विद्यार्थ्यांना दुप्पट शिष्यवृत्ती लाभ, मागील फी रचनेनुसार प्रवेश आणि एलेन शार्प मधील कामगिरीवर आधारित अतिरिक्त शिष्यवृत्ती मिळणार आहे, जी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. एलेन शार्प द्वारे, विद्यार्थ्यांना आकर्षक रोख बक्षिसांसह एलेन शुल्कावर 90% पर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.एलेन कोल्हापूर इयत्ता 7 वी ते 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी तसेच 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध अभ्यासिका कार्यक्रम आयोजित करेल. या अभ्यासक्रमांमध्ये JEE (मेन्स व अॅडव्हान्स), NEET-UG, MHT-CET, ऑलिंपियाड आणि PNCF (प्री-नर्चर आणि करियर फाउंडेशन) यांचा समावेश असेल.एलेन करियर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड बद्दल१८ एप्रिल १९८८ रोजी स्थापन झालेली एलेन करियर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील आघाडीची कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. जी सध्या २४ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमधील ७६ शहरांमध्ये अभ्यास केंद्रांद्वारे कार्यरत आहे. तसेच ७ देशांमध्ये कार्यरत आहे. एलेन चे संपूर्ण भारतात ३०० हून अधिक वर्ग कॅम्पस आणि ४०० हून अधिक कोचिंग क्लासेस आहेत. स्थापनेपासून, एलेन ने ४० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. ही संस्था प्री-इंजिनिअरिंग (जेईई मेन्स आणि अॅडव्हान्स्ड), प्री-मेडिकल (नीट-यूजी), आणि प्री-नर्चर अॅड करियर फाउंडेशन (इयत्ता ६ वी ते १० वी आणि ऑलिंपियाड) साठी प्रशिक्षण देण्यात अग्रेसर आहे. गेल्या १६ वर्षात २७ एलेन विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये ऑल इंडिया रैंक-१ मिळवला आहे.

