
प्रतिनिधी :रोहित डवरी
कोल्हापूर हॉकी स्टेडियमच्या शेजारील परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा होता. या परिसराची साफसफाई करण्याची जबाबदारी युवांनी स्वखुशीने स्वीकारली आणि अवघ्या काही तासांत परिसर पूर्णपणे स्वच्छ करून एक आदर्श ठेवला.या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व Sunil Dattatray Yadav, सामाजिक कार्यकर्ते व kolhapur_cha_vishay या लोकप्रिय इंस्टाग्राम चॅनेलचे प्रमुख यांनी केले. शहरातील नागरिकांमध्ये civic sense आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांचा Swachh Kolhapur Mission सध्या जोमात सुरू आहे.Sunil Yadav यांनी सांगितले की, “स्वच्छ शहर हे फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही. नागरिक, युवक आणि सोशल मीडिया यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच कोल्हापूरला देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत क्रमांक 1 वर येईल.”Yuva Foundation च्या मुलांनी केवळ साफसफाईच केली नाही तर पुढील 60 दिवस शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविण्याची शपथही घेतली.या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी व क्रीडाप्रेमींनी जोरदार स्वागत केले.

