
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
: टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणातील मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उद्ध्वस्त केले आहे. विद्यार्थ्यांकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रे व रोख रक्कम घेऊन पेपर देण्याचे आमिष दाखवणाऱ्या या टोळीवर 23 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सोनगे (ता. कागल) येथील शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये छापा टाकण्यात आला.
मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सात आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली. पुढील तपासात आणखी ११ जणांचा सहभाग उघडकीस आला असून मुख्य सूत्रधार महेश गायकवाडसह सर्व १८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्याचा तपास सुरू असून आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

