
एस पी नाईन प्रतिनिधी प्रा. मेघा पाटील
पुणे :मध्यप्रदेशातील उमर्टी परिसरात कार्यरत असलेल्या बनावट पिस्तूल तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अनेक बनावट पिस्तुलांची निर्मिती करणारे गुप्त कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले असून, गुन्हेगारी जगतात दहशत निर्माण करणाऱ्या या नेटवर्कला मोठा तडा बसला आहे.पुणे पोलिसांची विशेष टीम मागील काही दिवसांपासून या टोळीवर बारीक नजर ठेवून होती. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे टीमने मध्यप्रदेशमध्ये धाड टाकत बनावट पिस्तूल तयार करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश मिळवले. कारवाईदरम्यान पिस्तूल तयार करण्याचे साहित्य, बनावट हत्यारांची निम्मी तयार स्वरूपातील मालसाठा व महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले.ही कारवाई अत्यंत धाडसी आणि जोखमीची असल्याने पुणे पोलिसांनी तांत्रिक माहिती, गुप्त जाळे आणि अचूक नियोजनाच्या जोरावर ही मोहीम यशस्वी केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुणे पोलीस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार यांनी आज विशेष कार्यक्रमात या टीमचा सत्कार केला.आयुक्त अमितेश कुमार यांनी सत्कारावेळी सांगितले की,“बनावट शस्त्र निर्मिती हा गंभीर गुन्हा असून समाजाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण करणारा प्रकार आहे. पुणे पोलिसांनी दाखवलेली चातुर्य, धैर्य आणि तडफदार कामगिरी प्रशंसनीय आहे.सत्कार सोहळ्यात पुणे पुणे पोलीस उपायुक्त श्री रंजन शर्मा ,वरिष्ठ अधिकारी, तपास पथकातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या यशस्वी कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कार्यकौशल्याची आणखी एकदा ठसठशीत नोंद झाली आहे.


