कोल्हापूर २४ प्रतिनिधी
आपल्या मुंबई येथील मुख्य कार्यालयासह २५ शाखा विस्तारलेली महाराष्ट्र राज्यातील एक अग्रगण्य संस्था असलेली सुखकर्ता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने नुकतीच कर्मचाऱ्यांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.

सुखकर्ता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून तब्बल २५ शाखेचा विस्तार महाराष्ट्रातल्या मुंबई ,पुणे, सातारा, सांगली ,कोल्हापूर, सोलापूर अशा जिल्ह्यात झाला आहे. सर्वोत्तम सेवा व सुविधांच्या बळावर या संस्थेने अल्पावधीतच भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. संस्थेचे अध्यक्ष तानाजी गणपती मोहिते यांच्या मार्गदर्शनासाठी या आर्थिक वर्षात ५० कोटीचे भाग भांडवल उभे केले असून, १५० कोटी संमिश्र व्यवसाय केला आहे. नुकताच संस्थेचे अध्यक्ष तानाजी गणपती मोहिते यांना आपल्या अतुलनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवार्ड २०२६ घोषीत झाला आहे.

दैनंदिन कामकाजासाठी लागणारे तसेच को ऑप सेक्टरमध्ये होणारे बदल कर्मचाऱ्यांनास माहित होण्यासाठी त्यातील कायदे बंधने नवीन येणारी नियमावली यातून कर्मचाऱ्यांनी काम कसे करावे यासाठी हे प्रशिक्षण शिबिर कोल्हापूर येथे आयोजित केले होते.
या शिबिरासाठी प्रमुख वक्ते म्हणून आर वाय पाटील जनजागृती प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमुख मार्गदर्शक आर वाय पाटील तसेच जिल्हा बँकेचे माजी उपमुख्य अधिकारी आर डी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या प्रभावशाली, उत्साहपूर्ण वक्तृत्वने आर वाय पाटील यांनी उपस्थित कर्मचारीवर्गात उत्साह वाढविला. संस्था वृद्धीसाठी कर्मचारी वर्गाने मार्केटिंग , व्यवस्थापन , ताणतणाव याबाबतकश्या पद्धतीने काम करावे याचेही अचूक मार्गदर्शन आर वाय पाटील यांनी केले.
आर डी पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे सर्व अडी अडचणीला कशाप्रकारे सामोरे जावे आणि को ऑप सेक्टर मधील येणाऱ्या समस्याचे निराकरण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.
संस्थेसाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.

अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या या संस्थेचा 500 कोटी चा टप्पा येत्या काळात व्हावा यासाठी कर्मचारी वर्गाकडून आर वाय पाटील सरांनी एक खास संकल्प प्रतिज्ञा करून घेतली
यावेळी संस्थेचे चेअरमन तानाजी मोहिते, व्हाईस चेअरमन शिवाजी निकम, तसेच संचालक मंडळ संजय घोडे, सर्जेराव घोडे ,अमर जाधव ,शिवाजी मोहिते ,सुरेखा जाधव, नूतन माळी कार्यकारी संचालक एकनाथ माळी आदी उपस्थित होते.