संविधानाने भारताला धर्मनिरपेक्ष म्हणून घोषित केले – डॉ रायदुरगम नारायण

0
25

श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. रायदुरगम नारायण. सोबत लेफ्टनंट डॉ. मनीषा सावंत, शिवाजीराव पाटील, डॉ. विजयकुमार पाटील,

कोतोली प्रतिनिधी: पांडुरंग फिरींगे
भारतीय संविधानाची मांडणी, मूल्ये आणि लोकशाहीची भक्कम पायाभरणी करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान हे भारताचे सर्वोच्च शासकीय शास्त्र असून जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानाने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करत प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची अक्षय हमी दिली आहे, असे प्रभावी प्रतिपादन प्रा. डॉ. रायदुरगम नारायण यांनी केले.

ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, माळवाडी यांच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त व स्वर्गीय श्रीपतराव चौगुले (दादा) यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स महाविद्यालय व श्रीपतराव चौगुले विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे औचित्य साधत भव्य ‘संविधान पारायण सोहळा’ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. के.एस. होते यांनी भूषवले. प्रमुख उपस्थितीमध्ये संस्था सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्राचार्या डॉ. संपदा पिसे, ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार, तसेच पत्रकार विक्रम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रा. डॉ. रायदुरगम नारायण यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले.
यानंतर सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्य participation ने संविधान पारायण करण्यात आले. संविधानातील मूल्यांचा समाजजीवनात निष्ठेने अवलंब करणे हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत लेफ्टनंट डॉ. मनीषा सावंत यांनी केले. डॉ. संपदा पिसे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर डॉ. यु.एन. लाड यांनी मानलेले आभार कार्यक्रमाची सांगता अधिक सौंदर्यपूर्ण केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. डी.एच. नाईक यांनी केले.

कार्यक्रमास सर्व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान दिनाचे औचित्य साधत घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची भक्कम रुजवण करणारा ठरला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here