संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत नागरिकांनी माहिती घ्यावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे

0
16

प्रतिनिधी :जानवी घोगळे

कोल्हापूर दि : 26 (जिमाका) भारतीय संविधानाने नागरिकांना काही मूलभूत अधिकार व हक्क दिले आहेत या अधिकार व हक्कांबाबत नागरिकांनी माहिती घेऊन त्याचा अंगीकार करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.


भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन व संविधान समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ते बोलत होते.


याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकीयेन,सुषमा सातपुते अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर ,समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे,मनपा उपायुक्त परितोष कंकाळ,संशोधन अधिकारी संभाजी पवार,समाज कल्याण अधिकारी अक्षय कुरणे आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान जन जागृतीच्या उद्देशाने संपूर्ण वर्षभर जिल्हयात विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले .यावेळी त्यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधान रॅलीला हिरवा झेंडा दाखवला .या रॅलीमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,गंगाराम कांबळे स्मारक,सीपीआर मार्गे दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ वरील सर्व महामानवांना अभिवादन करून या रॅलीची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here