
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर :
आर्य समाज कोल्हापूर संचलित शाहू दयानंद विद्यालय, मंगळवार पेठ येथे आज महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे मान्यवरांनी सदिच्छा भेट देत संस्थेच्या कार्याचा गौरव केला. या भेटीत मा. श्री अर्जुनराव सोमवंशी (उद्गीर), मा. श्री उत्तमराव दंडिमे (पिंपरी-पुणे), श्री. महेश पाटील (हातकणंगले-कोल्हापूर) व डॉ. उदयप्रसाद चव्हाण हे विशेषरूपाने उपस्थित होते.
शाळेची शिक्षण पद्धती, विद्यार्थी विकासासाठी केलेली उपक्रमशीलता आणि आर्य समाजाच्या विचारांचा प्रसार या सर्व बाबींचा त्यांनी प्रत्यक्ष परीक्षेपणे आढावा घेतला.

🌟 शतकमहोत्सवी वर्षातील महत्वाची घोषणा
आर्य समाज कोल्हापूरच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या *मानवता संस्कार कन्या शिबिराबाबत मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्ष *मा. श्री दिलीपसिंह पाटील, पदाधिकारी आणि शिक्षक यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

कन्या विद्यार्थिनींसाठी संस्कार, आत्मविश्वास, स्वसंरक्षण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा संगम असलेले हे शिबिर अधिक भव्य व प्रभावी व्हावे यासाठी उपयुक्त मार्गदर्शनही करण्यात आले.
या भेटीद्वारे सामाजिक बांधिलकी, शिक्षणातील संस्कार आणि मानवी मूल्यांची जपणूक या आर्य समाजाच्या मूलभूत तत्वांचा पुन्हा एकदा उच्चार झाला.


