
जनतेच्या आरोग्यसेवेप्रती दृढ बांधिलकी व्यक्त
पन्हाळा प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
पोहाळे : तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रा. लि. ने आपल्या स्थापनेचा १३ वा वर्धापनदिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मूळ गावी – पोहाळे येथे साजरा केला. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प पुन्हा दृढ करत केंद्राने या विशेष दिवशी जनतेसाठी मोफत सल्ला व उपचार मार्गदर्शनही दिले.

१३ वर्षांची सेवायात्रा – लाखो रुग्णांना दिलासा
तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राने मागील १३ वर्षांत निसर्गोपचाराच्या माध्यमातून लाखो रुग्णांना मोफत सल्ला देऊन उपचारात मदत केली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच सीमाभागातील अनेक जिल्ह्यांमधून रुग्ण येथे येत आहेत. पारंपारिक निसर्गोपचार, औषधविरहित उपचारपद्धती, आहार-विहार मार्गदर्शन आणि कोणतीही चिरफाड न करता व जीवनशैलीत योग्य बदल यांद्वारे अनेक जणांचे आरोग्य सुधारले आहे.
वर्धापनदिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त
कार्यक्रमात बोलताना स्वागतजी तोडकर व सौ संजिवनी तोडकर (माई) यांनी सांगितले की,तोडकर संजीवनी होलिस्टिक मेडिकल कॉलेज,हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूटची नुकतीच मान्यता मिळाली आहे.यांचा विद्यार्थांना निश्चितच लाभ होईल.
“जनतेच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच संजीवनी केंद्र आज या उंचीवर पोहोचले आहे. पुढील काळातही आम्ही आरोग्यसेवेसाठी नेहमी कटीबद्ध राहू. निसर्गोपचाराची जागरूकता वाढवून अधिकाधिक लोकांपर्यंत ही जीवनदायी पद्धत पोहचवण्याचा आमचा संकल्प आहे.”
स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या वर्धापनदिन कार्यक्रमास तोडकर संजीवनी समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ तसेच अनेक रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी उपक्रमांची माहिती जाहीर करण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन विद्यार्थांना व कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात आले.
आरोग्यसेवेसाठी संपर्क
घरगुती उपचार, निसर्गोपचार सल्ला आणि अपॉइंटमेंटसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :
लँडलाइन :
- 0231-2688800
- 0231-3508800

