
कोल्हापूर प्रतिनिधी:पांडुरंग फिरिंगे
प्रविण विलासराव सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून उल्लेखनीय शैक्षणिक यशाची कमाई केली आहे. “Water Quality Monitoring and Evaluation Using Wireless Sensor Network” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिनव विषयावर त्यांनी केलेले संशोधन तांत्रिक शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घालणारे ठरले आहे.
हे संशोधन प्रा. डॉ. वाय. एम. पाटील, प्राध्यापक व विभागप्रमुख, ईटीसी विभाग, केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. जलगुणवत्ता मापनासाठी अत्याधुनिक वायरलेस सेन्सर नेटवर्कचा प्रभावी वापर, डेटा प्रक्रिया पद्धती, आणि स्मार्ट मॉनिटरिंग तंत्रज्ञान यांचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला असून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासाठी हा विषय अत्यंत उपयुक्त आहे.
सध्या प्रविण सावंत हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे कार्यरत असून त्यांच्या संशोधनामुळे विद्यापीठाच्या तांत्रिक संशोधन क्षेत्रात एक नवा आयाम जोडला गेला आहे.
या संपूर्ण संशोधन कार्यास खालील मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले —
प्रा. डॉ. आर. के. कामत, कुलगुरू, होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई
मा. प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, शिवाजी विद्यापीठ
प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव
कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे
स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्र-संचालक प्रा. डॉ. ए. बी. कोळेकर
प्रविण सावंत यांच्या या संशोधनात शास्त्रीय दृष्टीकोन, आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर आणि पर्यावरण संवर्धनाची जाण यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

