
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे –
“विद्यार्थ्यांनी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिकदृष्ट्या श्रीमंत व्हावे, यासाठी विवेकानंद कॉलेज प्रभावीपणे कार्यरत आहे. शिक्षणाबरोबरच कला व क्रीडा क्षेत्रातील संस्कार देणारे हे एक सक्षम केंद्र आहे,” असे गौरवोद्गार प्रख्यात सिनेअभिनेता मा. आनंद काळे यांनी काढले. ते विवेकानंद कॉलेजमध्ये आयोजित ज्युनिअर सायन्स एज्युकेशन फेअरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात होते.
आपल्या बहुविध अभिनयाने मराठी–हिंदी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवलेले आणि एक यशस्वी उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेले आनंद काळे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या नृत्य, गायन, वादन, अभिनय यांसारख्या सुप्त गुणांना वाव देणारे कार्यक्रम म्हणजे त्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे.”
प्राचार्य डॉ. थोरात यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सहभागी होऊन “बहुगुणी आणि कुशल व्यक्तिमत्त्व” घडवावे, असे सांगितले.
एज्युकेशन फेअरमध्ये ११वी–१२वी सायन्स विद्यार्थ्यांनी कलाप्रदर्शन, पोस्टर सादरीकरण, टाकाऊ पासून टिकाऊ, तसेच फूड स्टॉल या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे निर्मित संस्थाप्रार्थनेने झाली. प्रास्ताविक व स्वागत प्रा. नवले एम. आर. यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सौ. गीतांजली साळुंखे यांनी करून दिला. आभार प्रा. एस. टी. शिंदे यांनी मानले.
सुत्रसंचालन प्रा. सौ. ए. पी. साळोखे व प्रा. सौ. ए. पी. म्हात्रे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हिटणीकर एन. एन., प्रा. जगताप एस. एस., प्रा. नाकाडी एल. एस., प्रा. सौ. म्हात्रे ए. पी., प्रा. सौ. एस. ए. माने, प्रा. पाटील आर. एन., प्रा. आर. व्ही. घाटगे यांनी परिश्रम घेतले. रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे व सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजच्या बहुआयामी शैक्षणिक परंपरेला अधोरेखित करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

