नागरी वस्तीत जीवघेणी ११ हजार के.व्ही. वीजतारे! तात्काळ बंदोबस्त करा – करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

0
50

कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे –
करवीर तालुक्यातील सर्वात मोठे आणि दाट लोकसंख्या असलेले उचगाव—या गावातील मंगेश्वर कॉलनीमध्ये इमारतीला अगदी चिकटून जाणाऱ्या ११,००० के.व्ही. उच्चदाब विजेच्या तारेला लागून दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप उसळला आहे. सार्थक वळकुंजे (वय १६, उचगाव) आणि मोहम्मद अफान बागवान (वय १३, उजळाईवाडी) या दोन्ही मुलांनी याच जीवघेण्या तारेमुळे जीव गमावला.

उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गांधीनगर यांसारख्या घनदाट लोकवस्तीच्या भागांत ११,००० के.व्ही. विद्युत तारा घरांच्या अगदी माथ्यावरून किंवा भिंतीला चिकटून जात असतानाही महावितरणने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा गंभीर आरोप करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केला आहे.

“आणखी किती मृत्यू झाल्यानंतर महावितरण जागे होणार?” – राजू यादव

करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले—
“गेल्या दोन महिन्यांत दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला; तरीही महावितरण शांतपणे पाहत बसले आहे. लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा असताना महावितरणचे अधिकारी कोणती कारवाई करत नाहीत. वीजबिल वसुलीत सर्वात तत्पर असणारे हेच खाते; मग लोकांच्या सुरक्षेबाबत ही तत्परता का दिसत नाही? नागरी वस्तीत इमारतीवरून जाणाऱ्या ११,००० के.व्ही. तारा म्हणजे थेट मृत्यूचा सापळा आहे. तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन छेडू.”
मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख नुकसानभरपाईची मागणी

करवीर शिवसेनेने स्पष्ट मागणी केली की—

सार्थक वळकुंजे व

मोहम्मद अफान बागवान

यांच्या कुटुंबीयांना महावितरणने प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करावी, कारण हा मृत्यू सरळसरळ महावितरणच्या दुर्लक्षामुळे झाला आहे.

धोकादायक तारा हटवून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

दाट लोकवस्तीच्या घरांलगत, छतांवरून, बाल्कनीला चिकटून जाणाऱ्या उच्चदाब तारा तात्काळ हटवून सुरक्षित पर्यायी व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदन सादर — अधिकाऱ्यांचे आश्वासन

करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने हे निवेदन
मा. दत्तात्रय भणगे, कार्यकारी अभियंता, महावितरण कोल्हापूर ग्रामीण-२ विभाग
यांना ताराबाई पार्क येथे भेटून दिले.

अधिकाऱ्यांनी सांगितले—
“शहरालगतची उचगाव, उजळाईवाडी, गांधीनगर आदी सर्व गावांचा सर्वे करून धोकादायक तारा तातडीने बदलण्याची आणि सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची कामे लवकर सुरू करू.”
उपस्थित मान्यवर

या वेळी उपस्थित—
राजू यादव (तालुकाप्रमुख), पोपट दांगट (उपजिल्हाप्रमुख), अवधूत साळोखे (उपजिल्हाप्रमुख), राजू सांगावकर (कामगार सेना जिल्हाप्रमुख), राहुल गिरुले (उपतालुकाप्रमुख), योगेश लोहार (युवासेना), दत्ता फराकटे (वाहतूक सेना), कैलास जाधव (फेरीवाला संघटना), बाळासो नलवडे, सोमनाथ साठे, सागर पाटील, दीपक पोपटानी, सुनील पारपाणी, आबा जाधव, अजित चव्हाण, बाबुराव पाटील, रामराव पाटील, फिरोज मुल्लानी यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here