
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर आणि मालवण येथील शेकडो गरजू नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 40 ते 43 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य संशयित भारती भरत घारकर (रा. धुरीवाडा, मालवण) हिचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी आज फेटाळून लावला. या निर्णयामुळे तिच्या अटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
फेब्रुवारी 2023 ते 2025 या कालावधीत भारती घारकर हिने कोल्हापूर आणि मालवण परिसरातील अनेक कर्जदारांना “सिबिल खराब असले तरी कर्ज मंजूर करून देतो” असे खोटे आश्वासन देत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले. शुभम कृष्णात देशमुख (रा. एकोंडी) यांच्यासह अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा करून प्रत्यक्षात एकाही व्यक्तीस कर्ज न देता थेट आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकारात भारती घारकरसह तिचा मुलगा तेजस भरत घारकर, सागर प्रकाश आढाव, नीलम राजन शिंदे, लीना लुद्रीक, राजा बटाव या साथीदारांविरोधात कागल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3(5), 316(2), 318 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सर्व आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, न्यायालयाने आज भारती घारकर हिचा जामीन अर्ज सपाटपणे फेटाळून आरोपींकडून करण्यात आलेल्या व्यवस्थित आणि योजनाबद्ध फसवणुकीकडे गंभीर दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे नमूद केल्याचे समजते. कोल्हापूर आणि मालवण या दोन्ही ठिकाणी संशयितांच्या टोळीने मोठ्या प्रमाणावर लोकांना जाळ्यात ओढून रकमेचा गैरवापर केल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे.
जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता पोलिसांना आरोपींना अटक करण्याचा मार्ग अधिक सुकर झाला असून, या प्रकरणाचा मोठा घोटाळ

