
राजेश क्षिरसागर यांच्या कार्यालयासमोर ‘खर्डा–भाकरी’ खाऊन निषेध कोल्हापूर –
प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
महाराष्ट्रातील शेतकरी व कामगार वर्गाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे महायुती सरकारने निवडणुकीनंतर पाठ फिरविल्याचा आरोप करत कोल्हापूर शहरात आंदोलनाची ठिणगी पडली आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि नियोजन महामंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) मा. राजेश क्षिरसागर यांच्या कार्यालयासमोर आज शेतकरी व कामगार संघटनांनी ‘खर्डा–भाकरी खाऊन’ अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध नोंदविला.आंदोलनकर्त्यांनी घोषित केले की—“शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून ७/१२ कोरा करणे हा महायुतीने दिलेला शब्द तात्काळ पाळावा; तसेच कामगारांवर गदा आणणाऱ्या अन्यायकारक ४ कामगार संहिता त्वरित रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”कर्जबाजारी शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त, पण सरकार गप्प?आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सलग बदलणारे हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढते उत्पादन खर्च, खते–बियाण्यांचे तिप्पट दर आणि कोसळलेले बाजारभाव यामुळे शेतकरी अक्षरशः कर्जाच्या दलदलीत बुडत आहेत.

बँकांकडून थकबाकी नोटिसा, वाढते दंड–व्याज यामुळे शेतजमिनी जप्त होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.“शेतकऱ्यांनी महायुतीवर प्रचंड विश्वास ठेवून निवडणुकीत साथ दिली, परंतु दिलेले आश्वासन विसरले गेले. शेतकऱ्यांचे ओझे वाढले; सरकार मात्र मौन आहे,” असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.कामगारांवरील ‘चार संहिता’ म्हणजे हक्कांवर गदाकेंद्र सरकारने २९ जुने कामगार कायदे रद्द करून मंजूर केलेल्या ४ नवीन कामगार संहितांवरही संघटनांनी जोरदार प्रहार केला.नवीन कायद्यांमुळे—किमान वेतनाची निश्चिती कमकुवत,बोनस हक्क मर्यादित,संपावर बंधने,नियोक्त्यांना कामगार कमी करण्याची मोकळीक,सामाजिक सुरक्षेची कपात,कंत्राटी कामगारांचे संरक्षण अपुरेअसे गंभीर परिणाम होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.“हे कायदे सरळ कामगार शोषणाला उत्तेजन देणारे असून महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत लागू करता कामा नये,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.“आश्वासन पाळा, अन्यथा आंदोलन उग्र होईल” – संघटनांचा इशाराआंदोलनकर्त्यांनी शेतकरी व कामगार संघटनांशी तातडीने चर्चा करून— शेतकऱ्यांचे कर्ज संपूर्ण माफ करणे ७/१२ उतारा तातडीने कोरा करणे ४ अन्यायकारक कामगार संहिता रद्द करणे निवडणूकपूर्व दिलेली आश्वासने पाळणेया प्रमुख मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.“तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील आणि आवश्यक असल्यास हमीभाऊ आंदोलन, उपोषण, महामोर्चा आदी उग्र पावले उचलू,” असा इशाराही संघटनांनी दिला.आंदोलनात विविध संघटनांची एकजूटया आंदोलनात संभाजी आकागलकर, रघुनाथ कांबळे, देवेंद्र कांबळे, गणेश कुचेकर, दयानंद बुगाट, ज्योती माने, सलमा मेमन, ताजकुमार कांबळे, कल्पना शेंडगे, शिवाजी कांबळे तसेच विविध तालुका–शहर पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.आमदार क्षीरसागर अधिवेशनात असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवेदन घेतलं.


