महाराष्ट्र व्हेटरन क्रिकेट असोसिएशनमध्ये कोल्हापूरचा मान ! डॉ. चेतन नरके यांची सदस्यपदी निवड राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव

0
18

कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे –

महाराष्ट्र व्हेटरन क्रिकेट असोसिएशनच्या (एमव्हीसीए) सदस्यपदी कोल्हापूरचे डॉ. चेतन नरके यांची निवड झाली असून, या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यातील पी. वाय. सी. हिंदू जिमखाना येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.या बैठकीत कार्यकारी अध्यक्ष रणजित मोरे, संघटक सुधीर कुलकर्णी, खजिनदार कुनाल मोहोळ, तसेच पुजा शिंदे, हेमंत किणीकर, विक्रांत मते, सचिन मुळे आणि रणजित खिरीड** यांचीही महत्त्वपूर्ण पदांवर निवड झाली.महाराष्ट्र व्हेटरन क्रिकेट असोसिएशन ही BCICC संलग्न मान्यताप्राप्त संस्था असून, राज्यातील ज्येष्ठ खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. पुढील काळात जिल्हा स्तरावरील समित्या गठीत करून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यावरून राज्याचा संघ निवडला जाणार आहे. त्यानंतर देशपातळीवरील स्पर्धेतून अंतिम भारतीय संघ तयार होऊन दुबईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग मिळणार आहे.यामुळे महाराष्ट्रातील तसेच कोल्हापूरातील व्हेटरन क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.या असोसिएशनमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पेट्रॉन म्हणून कार्यरत असल्याने संस्थेची विश्वासार्हता आणि बळ वाढले आहे.नियुक्तीनंतर भावना व्यक्त करताना डॉ. चेतन नरके म्हणाले,“महाराष्ट्र व्हेटरन क्रिकेट असोसिएशनने माझ्यावर टाकलेला विश्वास महत्त्वाचा आहे. माजी खेळाडूंच्या हितासाठी आणि व्हेटरन क्रिकेटला राज्यात भक्कम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी संपूर्ण ताकदीने काम करणार आहे.”डॉ. नरके यांची ही निवड म्हणजे कोल्हापूरच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानाची बाब ठरत असून, जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रिकेटपटूंसाठी नवीन आशा आणि संधीचे दार खुलं झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here