एस.टी. महामंडळाने कारभार सुधारावा; प्रवाशांना नाहक बदनाम करू नये – ज्ञानेश्वर सुतार

0
139

पांडुरंग फिरींगे
पन्हाळा (प्रतिनिधी)
: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी आपला कारभार शिस्तबद्ध व प्रवासीहिताला पूरक पद्धतीने चालवावा. वारंवार फेऱ्या रद्द करणे, गरज नसलेल्या बस चालवणे, तिकीटदरांबाबत गोंधळ निर्माण करणे यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, त्यातून प्रवाशांनाच बदनाम केले जात असल्याचा प्रकार घडत आहे.

पन्हाळा पश्चिम भागात एस.टी. सेवा उत्पन्न देणारी असतानाही प्रवाशांच्या गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा बेजबाबदार निर्णयांमुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत असून सार्वजनिक वातावरण बिघडत आहे. ही परिस्थिती थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

“एस.टी. महामंडळाने आपला कारभार नीट चालवावा. प्रवाशांना नाहक बदनाम करू नये, तसेच कोणत्याही प्रकारे प्रवाशांची गैरसोय होऊ देऊ नये. गरज असलेल्या फेऱ्या सुरू करून पारदर्शक व प्रवासीहिताचे निर्णय घ्यावेत.”
ज्ञानेश्वर सुतार भाजप

प्रवाशांच्या सोयीस प्राधान्य देत वेळापत्रकात सुधारणा, तिकीटदरांबाबत स्पष्टता आणि जबाबदार अंमलबजावणी केली नाही, तर प्रवाशांचा रोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here