इचलकरंजी शहरात सापडलेल्या मुलांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा

0
65

प्रतिनिधी :जानवी घोगळे

कोल्हापूर दि. 16 (जिमाका): इचलकरंजी शहरातील विविध ठिकाणांहून मिळून आलेल्या मुलांच्या पालकांचा नातेवाईकांचा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून शोध सुरू असून या बालकांच्या पालक, नातेवाईकांनी दिलेल्या दूरध्वनी / मोबाईलवर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस. वाईंगडे यांनी केले. बाल कल्याण समिती यांच्याव्दारे दोन अल्पवयीन बालक व बालिका काळजी व संरक्षणाची गरज असल्याने त्यांना जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित सौ. नलिनी शा. पंत वालावलकर, कन्या निरीक्षणगृह/बालगृह, बाल कल्याण संकुल, मंगळवार पेठ, कोल्हापूर व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह, कोल्हापूर येथे दाखल केले आहे.
ही बालके चाईल्ड हेल्पलाईन यांच्या मार्फत बाल कल्याण समिती समोर सादर झाली असून 29 एप्रिल पासून बालकास कोणीही भेटावयास आलेले नाही. या बालकांना नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या करीता बालकाच्या नातेवाईकांनी अध्यक्ष / सदस्य, बाल कल्याण समिती, कोल्हापूर, जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित नलिनी शा पंत वालावलकर, कन्या निरीक्षणगृह/बालगृह, बाल कल्याण संकुल, मंगळवार पेठ, कोल्हापूर व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह, कोल्हापूर किंवा चाईल्ड लाईन, कोल्हापूर येथे 9923068135, 112, 0231-2646600 या क्रमांकावर 30 दिवसांच्या आत संपर्क साधावा.कु. गुरू मनोहरलाल भांबी, वय 10 वर्षे तसेच  कु. तारा मनोहरलाल भांबी वय 09 वर्षे ही दोन्हीं भांवडे जे. के. नगर, तारदाळ, इचलकरंजी येथे विनापालक फिरताना मिळून आले. या बालकांना त्यांच्या पत्याबाबत विचारले असता ते फक्त रा. भिलवाडा, राजस्थान इतकिच माहीती सांगतात. त्यानुसार संस्थेने पालकांचे संपर्काबाबत प्रयत्न केला असता पालक मिळून आलेले नाहीत. तरी कु. गुरू मनोहरलाल भांबी व कु. तारा मनोहरलाल भांबी या बालकाच्या पालकांनी, नातेवाईकांनी अथवा पालकांबाबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष माहिती असल्यास संबधितांनी वरील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here