
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : मधुमेह व प्रीडायबेटिक अवस्थेचे निदान करण्यासाठी HbAlc या चाचणीची आवश्यकता असते व या चाचणीसाठी लागणारे अत्याधुनिक यंत्र Fully Automated HbAlc Analyzer (HPLC Method) Lab Tech Health care PVT.LTD. श्री. महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्स, कोल्हापूर यांच्याकडून देणगी स्वरुपात प्राप्त झाले आहे. यावेळी अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. राहुल चौधरी, डॉ. गिरीष कांबळे, वैद्यकीय उपअधिक्षक उपस्थित होते. या चाचणीचा लाभ जिल्ह्यातील व जिल्ह्यालगत असलेल्या गरजु रुग्णांना होईल असा आशावाद डॉ भिसे यांनी यावेळी व्यक्त केला.

