मलकापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ : जन सुराज्य शक्तीचा झेंडा, रश्मी कोठावळे नगराध्यक्षपदी विजयी

0
16

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी | मलकापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जन सुराज्य शक्ती पक्षाने भक्कम कामगिरी करत नगरपरिषदेत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकूण १० वार्डांमधून २० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत जन सुराज्य शक्तीने बहुसंख्य जागांवर विजय मिळवला असून नगराध्यक्षपदावरही पक्षाने आपली मोहोर उमटवली आहे.

नगराध्यक्षपदी रश्मी कोठावळे यांचा दणदणीत विजय*

नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत जन सुराज्य शक्ती पक्षाच्या रश्मी शंतनु कोठावळे यांनी २२६५ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे मलकापूरच्या राजकारणात जन सुराज्य शक्तीची ताकद अधोरेखित झाली आहे.

वार्डनिहाय निकाल*

वार्ड १

  • अ – निलम किरण लगरे – जन सुराज्य शक्ती (२२७)
  • ब – दिलीप आनंदा पाटील – जन सुराज्य शक्ती (२४९)

वार्ड २

  • अ – संजय बळवंत मोरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१७१)
  • ब – सुरेखा विलास घाडगे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (२२७)

वार्ड ३

  • अ – अभिजीत दिलीप गुरव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१६८)
  • ब – भाग्यश्री प्रदीप पवार – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (११३)

वार्ड ४

  • अ – पल्लवी सुरेश पवार – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१७४)
  • ब – महेंद्र मनोहर कोठावळे – भारतीय जनता पार्टी (१४५)

वार्ड ५

  • अ – ओमकार संभाजी भोपळे – जन सुराज्य शक्ती (३६५)
  • ब – गीता बाबासाहेब पाटील – जन सुराज्य शक्ती (२८४)

वार्ड ६

  • अ – सुरेखा दिलीप कांबळे – जन सुराज्य शक्ती (२९२)
  • ब – रमेश बाबु चांदणे – जन सुराज्य शक्ती (२५९)

वार्ड ७

  • अ – किरण चंद्रकांत घेवडे – जन सुराज्य शक्ती (३२६)
  • ब – पूजा निलेश चव्हाण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१९०)

वार्ड ८

  • अ – साक्षी शैलेश गणेश – जन सुराज्य शक्ती (२६५)
  • ब – अमोल मधुकर केसरकर – जन सुराज्य शक्ती (बिनविरोध)

वार्ड ९

  • अ – गिरीजा ऊर्फ दिपाली प्रतापसिंग कोकरेदेसाई – जन सुराज्य शक्ती (२५६)
  • ब – खंडेराव हणमंत पळसे – जन सुराज्य शक्ती (१९८)

वार्ड १०

  • अ – नेहा इंद्रनिल बेर्डे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१९०)
  • ब – रविराज नानासो कोकरेदेसाई – अपक्ष (३१४)

जनतेचा कौल स्पष्ट*

या निकालातून मलकापूरच्या मतदारांनी विकास, स्थैर्य आणि स्थानिक नेतृत्वावर विश्वास दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः जन सुराज्य शक्तीच्या उमेदवारांना अनेक वार्डांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळाल्याने आगामी काळात नगरपरिषदेत निर्णायक भूमिका या पक्षाची राहणार आहे.

विजयानंतर जल्लोष

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून, गुलाल उधळून व घोषणा देत आनंद साजरा केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष रश्मी कोठावळे यांनी जनतेचे आभार मानत “मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करू” अशी ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here