तुमची स्वप्ने चांगले आहेत, तुमची पिढी हुशार आहे, त्यामुळे पुढील पाच ते दहा वर्षाचा आराखडा तयार करून मेहनत करा म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर उभे रहाल. कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांमध्ये भरपूर कौशल्य आहेत त्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता.
‘ असे मत थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार डॉ. चेतन नरके यांनी व्यक्त केले. येथील शहीद विरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये शिक्षक दिनानिमित्त
आयोजित परिसंवादांमध्ये ते बोलत होते.
आयुष्य जगण्याचे दोन ते तीन पर्याय प्रत्येकाने उपलब्ध ठेवायला हवेत. या गोष्टी विद्यार्थी दशेतच निश्चित करा आणि आयुष्यात स्थिर व्हा. आजच्या पिढीने नोकऱ्या मागण्या पेक्षा वेगवेगळ्या व्यवसायातून नोकऱ्या देणारे बनलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन मास मीडिया विभाग अंतर्गत करण्यात आले होते.
या वेळी राजेंद्र मकोटे, उपप्राचार्य सागर शेटगे महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सुत्रसंचालन पौर्णिमा पाटील यांनी केले तर आभार प्रा. शुभांगी भांदिगरे यांनी मानले.