
कर्नल विनोद कुमार पाटील यांचे विवेकानंद कॉलेजमध्ये प्रेरणादायी मार्गदर्शन
कोल्हापूर| प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
भारतीय सैन्यदल हे केवळ देशाच्या सुरक्षेचे रक्षण करणारे बळ नाही, तर राष्ट्रभक्ती, शिस्त, नेतृत्व आणि आत्मविश्वास घडविणारे जगातील सर्वात सक्षम व स्वयंपूर्ण प्रशिक्षण केंद्र आहे, असे प्रतिपादन कर्नल विनोद कुमार पाटील (उप कमांडंट, मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव सेंटर) यांनी केले.
विवेकानंद कॉलेजच्या एनसीसी विभाग व आयक्यूएससी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय सैन्यदल आणि निवड प्रक्रिया” या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कर्नल पाटील म्हणाले, “विद्यार्थीदशेतच भारतीय सैन्यदलातील प्रवेश प्रक्रिया, संधी व आवश्यक तयारी याची सखोल माहिती घेतली, तर योग्य वयात करिअरचा ठोस आणि सन्मानाचा मार्ग निवडता येतो. सैन्यदलातून राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि समाजसेवेबरोबरच नेतृत्वगुण, संघटनशक्ती, शिस्त, धैर्य व संकटांशी सामना करण्याची क्षमता विकसित होते. हीच खरी स्व-सिद्धता आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात होते. त्यांनी आपल्या मनोगतात “विवेकानंद कॉलेज हे समाजाभिमुख शिक्षण देणारे ज्ञानकेंद्र असून, येथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी समाजाच्या गरजेनुसार व्यावहारिक करिअर संधी शोधण्यास सक्षम होतात,” असे नमूद केले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. श्रुती जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन मेजर सुनीता भोसले यांनी केले.
प्रास्ताविक व स्वागत लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जेयूओ राजलक्ष्मी भोसले व सार्जंट सानिका घोडके यांनी केले, तर आभारप्रदर्शन एसयूओ वैष्णवी ढेगे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालयीन अधीक्षक श्री. सचिन धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रेरणादायी कार्यक्रमास एनसी

