डॉ.धर्मवीर भारती या श्रेष्ठ साहित्यिकाराचे जन्म शताब्दी साजरी

0
16

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
डॉ.धर्मवीर भारती या श्रेष्ठ साहित्यिकाराचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. साहित्यातील सर्व प्रकारावर आपली लेखणी चालवलेले असे एक लेखक,कवी,नाटककार इत्यादी रूपामध्ये आपल्या समोर येतात त्यांच्या साहित्यातून समाजाला बाधित नीती मूल्यांना विरोध कारण्याचे विचार दिसून येतात
असे प्रतिपादन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रोफेसर डॉ.बी.एन.रावण यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ.बी.एन.रावण यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील हिंदी विभागामार्फत “धर्मवीर भारती यांचे व्यक्तित्व व कृतित्व ” या विषयावर आयोजित केलेल्या भित्तीपत्रक प्रकाशन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रोफेसर डॉ.बी. एन.रावण बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सहसमन्वयक डॉ.एस. एस.कुरलीकर होते.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.यु.एन.लाड,प्रा.एम.वाय.पोवार, प्रा.ए.आर.महाजन,डॉ.यु.यु.पाटील व आर्टस् व सायन्सचे प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाची विद्यार्थिनी सानिका गायकवाड हीने केले,स्वागत व पाहुण्यांची ओळख हिंदी विभाग प्रमुख डॉ.वंदना पाटील यांनी,आभार मधुरा पाटील हीने मानले तर सूत्रसंचालन प्रा.रुपाली पाटील यांनी केले.

कार्यक्रमास सर्व शिक्षक,विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

फोटो ओळ- श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये धर्मवीर भारती यांचे व्यक्तित्व व कृतित्व या भित्तीपत्रकाचे प्रकाशन प्रसंगी
डॉ.बी.एन.रावण,डॉ.एस.एस.
कुरलीकर,डॉ.वंदना पाटील,प्रा.रुपाली पाटील, डॉ.यु.एन.लाड,प्रा.एम.वाय.पोवार, डॉ.यु.यु.पाटील, व मान्यवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here