
पुणे | प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि सर्वांच्या बरोबर सदैव हसतमुख राहणारे, व्यंकटेश्वरा कंपनीचे मॅनेजर कै. श्री. संजय बागाव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने पुणे शहर व जिल्ह्यातील मातंग समाजासह सिंहगड, गोरे खानापूर, शंभर खेडी व परिसरातील सर्व समाजबांधवांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.
कै. संजय बागाव हे अत्यंत मनमिळावू, समाजप्रिय आणि निस्वार्थ वृत्तीने काम करणारे व्यक्तिमत्त्व होते. व्यंकटेश्वरा कंपनीत कार्यरत असताना त्यांनी आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि नेतृत्वगुणांच्या बळावर कंपनीला देशपातळीवर नावलौकिक मिळवून दिला. कंपनीसाठी काम करत असतानाच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनता व समाजहितासाठी अर्पण केले.
ते युवा लहुजी संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्य सल्लागार म्हणूनही सक्रिय होते. समाजातील युवकांना दिशा देणे, सामाजिक न्यायासाठी आवाज उठवणे आणि गरजूंसाठी सदैव पुढे राहणे हीच त्यांची ओळख होती. त्यांच्या विचारांनी व कार्याने असंख्य युवक प्रेरित झाले.
त्यांच्या दुःखद निधनाने पुणे शहर जिल्हा मातंग समाजासह महाराष्ट्रातील संपूर्ण मातंग समाजाने एक जिव्हाळ्याचा नेता, मार्गदर्शक आणि समाजाचा खरा आधारस्तंभ गमावला आहे.
कै. संजय बागाव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नात असा परिवार आहे.
आरक्षण विसर्जनाचा विधी दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे होणार आहे.
पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने व महाराष्ट्रातील समस्त मातंग समाजाच्या वतीने ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

