प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपचा अंतर्गत घोटाळा?20 वर्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील वाडकर यांचे ऐनवेळी तिकीट कापल्याने राजकीय खळबळ

0
181

प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोल्हापूर :भारतीय जनता पक्षासाठी गेली २० वर्षे प्रामाणिकपणे कार्य करणारे, प्रभाग क्रमांक २० मधील भाजपचे निष्ठावंत नेते श्री. सुनील दिनकरराव वाडकर यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला असतानाही ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याने महापालिका निवडणूक रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी व नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.प्रभाग क्रमांक २० हा सुमारे ३२ हजार मतांचा प्रभावी प्रभाग असून, या संपूर्ण प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून वाडकर यांचे मजबूत वर्चस्व आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये, तत्कालीन जुना प्रभाग क्रमांक ७९ (सुर्वे नगर) व सध्याच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये महायुतीच्या उमेदवारांविरोधात वातावरण असतानाही, एकहाती सुनील वाडकर यांनी १५०० ते २००० मतांचे लीड देत भाजप व महायुती मजबूत केली होती, हे विशेष.महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून पक्षातील वरिष्ठ नेते, संघाचे कार्यकर्ते तसेच विविध माध्यमांतून “सुनील तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत”असे आश्वासन वाडकर यांना दिले जात होते. त्यानुसार वाडकर व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य, तसेच कार्यकर्ते प्रभागाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून जोरदार तयारी करत होते.सुमारे पंधरा दिवसांपूर्वी, वाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांना “तुमच्या तिघांचा पॅनल फिक्स आहे, एकत्र सभा घ्या” असे स्पष्ट सांगण्यात आले होते. त्यानंतर काल सकाळी अधिकृतपणे भाजपचा एबी फॉर्म वाडकर यांना देण्यात आला.मात्र, त्याच रात्री अचानक घोटाळा करून सकाळी वाडकर यांचे तिकीट कापण्यात आले, आणि पक्षाचा एबी फॉर्म दुसऱ्याच कार्यकर्त्याला देण्यात आल्याचे समोर आले आहे.या प्रकारामुळे प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाडकर यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असताना, ऐनवेळी झालेल्या या निर्णयामुळे पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते सुनील वाडकर पुढील राजकीय भूमिका काय घेणार? याकडे. सध्या तीन शक्यता चर्चेत आहेत —1️⃣ वाडकर महायुतीविरोधात थेट भूमिका घेणार का?2️⃣ महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष अथवा थेट मदत करणार का?3️⃣ की तिसरी आघाडी उभी करून स्वतंत्र ताकद दाखवणार?या निर्णयावर केवळ प्रभाग क्रमांक २०च नव्हे, तर कोल्हापूर महापालिकेतील राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुनील वाडकर यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here