
प्रतिनिधी : पांडुरंग पाटील
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न कोतोली प्रतिनिधी पांडुरंग भगवान संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता जपताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणे हीच नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची ओळख असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संचालक गजानन पाटील यांनी केले. ते येथील नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कोतोली येथे शैक्षणिक वर्ष २०२४–२५ साठी आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुरेश लोहार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महादेव नलवडे, माजी प्राचार्य पी. एस. पोर्लेकर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.अध्यक्षीय भाषणात प्रा. लोहार यांनी गुणवत्तेची जोपासना, शिस्त व सातत्य यांवर भर देत विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच मूल्यशिक्षण आत्मसात करावे, असे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांनी महाविद्यालयीन शिक्षणात संशोधनवृत्ती, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले.यावेळी शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम तसेच विविध सामाजिक व विस्तार उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक खोत यांनी केले, तर आभारप्रदर्शन युवराज पाटील यांनी मानले.

समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. वाय के.पाटील,एस.डी.पाटील, सुभाष लव्हटे, शिवाजी कुंभार चेतन जाधव, अरुण सावंत, सागर कांबळे, लक्ष्मी बोरगे, सरिता पोवार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक उपस्थित होते.फोटो ओळ -कोतोली येथील नेहरू विद्यामंदिर च्या वार्षिक स्नेहसंमेलनात बक्षीस वितरण करताना गजानन पाटील,पी.एस.पोर्लेकर, मुख्याध्यापक सुरेश लोहार,वाय के पाटील, विलास गंधवाले आदी उपस्थित होते.

