
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
श्रीपदराव चौगुले कॉलेजमध्ये एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्नकोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे एम.ए., एम.एस्सी.चे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी नेट/सेट परीक्षेचा गंभीरपणे अभ्यास सुरू करणे अत्यावश्यक आहे. योग्य दिशा व गती मिळवायची असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःला सातत्याने प्रश्न विचारले पाहिजेत. लेखी परीक्षेचे तंत्र समजून घेतले, तर प्रश्न समजणे आणि योग्य उत्तर लिहिणे सहज शक्य होते. परीक्षेची भीती मनातून काढून टाका, प्रश्नांशी मैत्री करा; यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले.ते श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील सायन्स विभागामार्फत आयोजित केलेल्या एकदिवसीय नेट / सेट मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, या भागातील विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन विविध क्षेत्रांत प्रगती करावी, या उद्देशाने या महाविद्यालयाची स्थापना डॉ. के. एस. चौगुले यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन व अभ्यासपद्धती अवलंबली, तर कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश निश्चित मिळते.कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना महावीर कॉलेज, कोल्हापूर येथील बी.ए.-बी.एड्. विभागाचे प्राध्यापक डॉ. शशिकांत अन्नदाते म्हणाले की, सध्याची शिक्षणपद्धती ही विद्यार्थी-केंद्रीत आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच कौशल्ये आणि चांगल्या सवयी आत्मसात केल्या पाहिजेत. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्यपूर्ण सराव करा; यश नक्कीच मिळेल.कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील, ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार, हिंदी विभाग प्रमुख डॉ. वंदना पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सहसमन्वयक डॉ. एस. एस. कुरलीकर, कार्यशाळा समिती प्रमुख डॉ. यु. एन. लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. बी. एन. रावण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तब्बू कवठेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ट्विंकल सावंत यांनी मानले.कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो ओळ :श्रीपतराव चौगुले कॉलेज, माळवाडी-कोतोली येथे आयोजित एकदिवसीय नेट / सेट मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. कृष्णा पाटील. समवेत (डावीकडून) डॉ. बी. एन. रावण, शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. शशिकांत अन्नदाते, डॉ. उषा पवार, प्रा. शितल चौगुले, डॉ. यु. एन. लाड, डॉ. एस. एस. कुरलीकर, डॉ. वंदना पाटील, प्रा. तब्बू कवठेकर व मान्यवर.

